तरुणीचा विनयभंग करणाऱ्या मित्राला मदत केल्याप्रकरणी यासिर शाहविरुद्ध एफआयआर

0
24

एका मुलीचे अपहरण, विनयभंग आणि धमकावल्याच्या आरोपावरून पोलिसांनी पाकिस्तानचा टेस्ट लेगस्पिनर यासिर शाह आणि त्याच्या मित्राविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे.

मुलीने तक्रार केल्यानंतर लाहोरमधील शालीमार पोलिस ठाण्यात एफआयआर नोंदवण्यात आला. पाकिस्तानच्या क्रिकेटपटूने अद्याप यावर प्रतिक्रिया दिलेली नाही.

एफआयआरमध्ये मुलीने आरोप केला आहे की, यासिरचा मित्र फरहान याने बंदुकीच्या जोरावर तिचे अपहरण केले, तिच्यावर बलात्कार केला, तिचा व्हिडिओ बनवला आणि नंतर तिला धमक्या दिल्या.

यासिर शाहने आपल्या मित्राला मदत केल्याचा आरोप तरुणीने केला आहे आणि नंतर फरहानने तिला धमकावले की तिने आवाज उठवला तर तिचे व्हिडिओ प्रसिद्ध करू.

पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीनुसार, मुलीने यासिरला व्हॉट्सअॅपवर संपर्क साधून मदतीची याचना केली तेव्हा तो तिच्यावर हसला आणि तिला या संपूर्ण प्रकरणाबद्दल गप्प राहण्यास सांगितले.

तरुणीचा असाही दावा आहे की, जेव्हा ती पोलिसात गेली तेव्हा यासीरने तिला 18 वर्षांसाठी फ्लॅट आणि मासिक खर्च देण्याची ऑफर दिली, जर ती शांत राहिली.

बोटाच्या दुखापतीमुळे यासिरने नुकत्याच झालेल्या कसोटी मालिकेसाठी बांगलादेशला गेला नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here